शेत रस्ता म्हणजे शेतकऱ्यांची जीवनरेखा. ग्राहकांपर्यंत शेतमाल पोहोचवण्यासाठी रस्ते अत्यंत महत्त्वाचे आहेत. अडथळा, अतिक्रमण किंवा नवीन रस्ता यासाठी तहसील कार्यालयामार्फत अर्ज करता येतो. आता ही प्रक्रिया डिजिटल स्वरूपात "जीवनरेखा" पोर्टलद्वारे सोपी, पारदर्शक आणि सुलभ करण्यात आली आहे.
👉 एखादा चालू वहीवाटीचा रस्ता एखाद्या खातेदारांनी अडवलेला असल्यास, त्यासाठी मामलेदार न्यायालय अधिनियम 1906 चे कलम 5 अन्वये अर्ज करता येईल.
👉 एखाद्या शेतकऱ्याला आपल्या शेताला कोणताच रस्ता उपलब्ध नसल्यास, त्यासाठी महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 143 अन्वये अर्ज करता येईल.
👉 सरकारी रस्त्यावर किंवा नकाशावरील रस्त्यावर एखाद्या लगतच्या खातेदाराने अतिक्रमण केले असल्यास, त्याबाबत काढून टाकण्याची तरतूद देखील आहे.
ऑनलाइन अर्जाद्वारे वेळेची बचत
संपूर्ण प्रक्रियेवर शेतकऱ्याचा नियंत्रण
मोबाईलवरूनच तक्रार नोंदणी व ट्रॅकिंग